दहावीनंतर करिअर निवडताना?



दहावीनंतर करिअर निवडणे ही पालकांसाठी एक चिंतेची बाब असते, हा निर्णय खूप महत्वाचा असतो त्यामुळे डोळे झाकून निर्णय न घेता सद्य:परिस्थिचा अभ्यास करून मगच निर्णय घेणे योग्य ठरते. 
दहावीनंतर शिक्षणाचे बरेच ऑप्शन्स उपलब्ध असतात पण जागतिक घडामोडी पाहता येणाऱ्या काळात तंत्रशिक्षणाची वाट म्हणजे प्रगती ची वाट हे सूत्र असणार आहे. कारण टेक्नॉलॉजी मध्ये दररोज प्रचंड बदल होत आहेत, टेक्नॉलॉजीने प्रत्येक क्षेत्रांत शिरकाव केला आहे. आता मेडिकल सेक्टर व फायनान्स सेक्टरही त्यास अपवाद राहिले नाही. यांतही टेक्नॉलॉजी चा वापर सुरू झाला आहे मग तो आर्टिफिशल इंटेलिजन्स चा वापर असो किंवा ऑटोमेशन-रोबोटिक्स चा वापर असो. प्रत्येक क्षेत्र आता टेक्नॉलॉजीवर विसंबून आहे.

न्यू एज्युकेशन पॉलिसी २०२० चा विचार केला तर आता आपल्याला फक्त ज्ञान घेऊन चालणार नाही तर एखादे तंत्रज्ञान अवगत करणे अपरिहार्य होणार आहे. या पॉलिसीचाच एक भाग म्हणजे आता ०६ वी पासूनच विद्यार्थ्यांना कोडिंग आणि प्रोग्रामिंग सारखे विषय शिकवले जाणार आहेत याचाच अर्थ तंत्रशिक्षण, आणि तंत्रज्ञान यांच्याशी मैत्री हेच यशाचे गमक असणार आहे.

तंत्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना बऱ्याच वाटा खुल्या होणार आहेत, मग ते स्पर्धा परीक्षा असोत किंवा सरकारी नोकऱ्या असोत. तंत्रशिक्षण घेऊन तुम्ही आर्मी, नेव्ही, तसेच इसरो (ISRO) सारख्या संस्थेत सुध्दा काम करू शकता. तरी विद्यार्थी व पालकांनी आपला करिअर निवडताना या सर्व बाबी अभ्यासणे आवश्यक आहे. 

एस. आर. नदाफ
शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

Post a Comment

1 Comments

Soon will start English Speaking series