ऑटोमेशन आणि रोबोटिक्स चे युग....
येणारे युग हे ऑटोमेशन आणि रोबोटिक्स चे असणार आहे यात तिळमात्रही शंका नाही. उद्योग करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. आता उद्योगांचे यश आणि भविष्य हे ऑटोमेशन आणि रोबोटिक्स मध्ये दडलेले आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. 
बऱ्याच उद्योगांमध्ये पारंपारिक यंत्रांची जागा आता आधुनिक यंत्रांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. मग ते पॉवर लूम च्या जागा ऑटो लूम असेल किंवा लेथ मशीनच्या जागी CNC मशीन असेल. प्रत्येक सेक्टर मध्ये ऑटोमेशन आणि रोबोटिक्स ने शिरकाव केला आहे मग ते ऑटोमोबाईल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल प्रत्येक क्षेत्रांत ऑटोमेशन ची गरज भासत आहे आणि परिणामी ऑटोमेशन आणि रोबोटिक्स इंजिनिअरची मागणी वाढत आहे.
अर्थशास्त्रामधील मागणी व पुरवठा या सूत्राचा विचार केल्यास रोबोटिक्स इंजिनीअर ची मागणी ही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे या क्षेत्रांत भारतात व भारताबाहेर प्रचंड संधी उपलब्ध झाल्या आहेत. हेच लक्षात घेऊन शरद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि शरद पॉलिटेक्निक मध्ये ऑटोमेशन आणि रोबोटिक्स ही अत्याधुनिक ब्रँच यावर्षी सुरू करण्यात आली आहे तरी विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर साठी त्याचा विचार करावा.

एस आर नदाफ
शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निक

Post a Comment

0 Comments