तुमची किंमत....


जर तुम्हाला फुलाची किंमत जाणून घ्यायची असेल तर फुलपाखराला विचारा ...

 होय ...

केवळ फुलपाखरूच तुम्हाला फुलाची खरी किंमत सांगू शकेल आणि फूल किती खास आहे व जगण्यासाठी किती महत्वाचे आहे याची जाणीव तुम्हांला करून देईल. ते फुलाच्या निखळ सौंदर्याचे वर्णन करेल. फुलांमध्ये असणाऱ्या काट्याकडे ते दुर्लक्ष करेल आणि फुलांच्या पाकळ्यांवर लक्ष केंद्रित करेल.

आणि जर तुम्हाला तुमची खरी किंमत जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि काळजी घेणाऱ्या लोकांना विचारा.  ते तुमच्या  सर्व गुणांची यादी तुम्हांला वाचून दाखवतील तुमच्या सर्व चांगल्या सवयी सांगतील, तुमच्यामध्ये काय उत्कृष्ट आहे सांगतील. कारण तुम्ही त्यांच्यासाठी खास असता नेहमीच

SRN

Post a Comment

0 Comments