मराठी लेखन



🔴 25.01.2022
ओळखीचा तर होता मुखवटा
खरा चेहरा तो अजून अनोळखी

#SRN


🔴 30.09.3021

जीवनाच्या या प्रवासात, सोबती जेंव्हा शब्द झाले,
प्रवास झाला सुकर आणि रस्तेही बहरून आले 

SRN




🔴 28.09.2021
जेंव्हा माणुसकीत तुमच्याशी कोणी जिंकतं तेंव्हा सर्व स्पर्धा संपतात, आणि जिंकणारा नकळत तुम्हांला माणुसकीचा खरा अर्थ शिकवून जातो. 

SRN



🔴26.09.2021
शब्दही अपुरे पडले, कळला नाही भाव,
व्यक्त होण्यासाठी मग डोळ्यांनी घेतली धाव ।

SRN


🔴 25.09.2021

बऱ्याचवेळा आपल्या हरवलेल्या वस्तू आपल्याला अनपेक्षितपणे आपल्याच घराच्या कोणत्यातरी अनोळखी कोपऱ्यात सापडतात. त्याचप्रमाणे आपल्याला पडलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे ही आपल्याच अंतर्मनाच्या अनोळखी कोपऱ्यात लपलेली असतात. पण तो अनोळखी कोपरा शोधण्यासाठी वैचारिक शुध्दता असणं गरजेचं आहे.

SRN

🔴 22.09.2021

काही पुस्तके वाचताना ती कधीच संपू नयेत असं वाटतं....
#SRN

🔴
स्वतःची इतरांशी तुलना करणे म्हणजे संकुचित मानसिकतेचे दर्शन होय
#SRN #मराठीलेखणी


🔴
जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक आहात तोपर्यंत सत्य सोपे आहे


🔴
शब्दांच्या पलीकडे अर्थांचे घर आहे,
अर्थांच्या घराला भावनांचे कुलूप आहे.
"भावना कळल्या की अर्थही कळतो"
#SRN #मराठीलेखणी


🔴
जीवन हे समुद्रासारखे आहे, कधी उंचच उंच लाटा तर कधी शांत प्रवाह, कधी वादळ, तर कधी वीजांचा कडकडाट... 
उंच लाटांवर स्वार व्हा, तर कधी प्रवाहाबरोबर शांत व्हा, कधी काळजीपूर्वक पाऊल उचला, तर कधी एक पाऊल मागे घ्या...
जीवनाची प्रत्येक गोष्ट जगा

🔴
पत्त्यांच्या डावात जोकर चा वापर खेळ सुटण्यासाठी सर्व ठिकाणी केला जातो, खेळ सुरू असताना त्याला फार किंमत असते, सगळ्यात जास्त. पण शेवटी खेळ संपल्यानंतर ज्यावेळी त्या जोकरला वेगळं केलं जातं त्याची किंमत शून्य होते. 
तुम्ही जोकर बनू नका....


🔴 
सोप्या शब्दांचेही अर्थ आता गूढ होत गेले,
उत्तरांचेही त्या आता प्रश्न तयार झाले।

🔴
जेव्हा निसर्ग तुम्हाला जिंकवू इच्छितो तेव्हा तुम्ही जिंकता

🔴
होणाऱ्या चुकांची कारणे शोधली की चुकांची पुनरावृत्ती होत नाही. पण चुका टाळायच्याच नसतील तर कारणे शोधली जात नाहीत.
#SRN #मराठीलेखणी

🔴
तुम्हांला माणसांची ओळख करता येत नसेल 
तर तुमची ओळख विसरायला तयार रहा

🔴
लोकांचे एवढे मुखवटे असतात की, मुखवटा कोणता आणि खरा चेहरा कोणता हे ओळखणे अशक्य होऊन जाते.

🔴
आपण एखादी जबाबदारी स्वीकारली की इतरांच्या नजरेत आपली किंमत वाढते. आणि ही किंमतच आपल्याला ती जबाबदारी पार पडण्याची ऊर्जा देत असते.

🔴
ओझं आणि जबाबदारी यातील फरक समजला की तुम्ही यशस्वी होता.

🔴
स्वप्न आणि सत्य यामधील अंतर म्हणजे प्रामाणिक प्रयत्न

#SRN #मराठीलेखन

Post a Comment

0 Comments