पोस्ट पॅडेंमिक बूम आणि तंत्रशिक्षण (Post Pandemic Boom & Technical Education)

student



अर्थतज्ञ व इतिहासकारांच्या मते एका मोठ्या pandemic नंतर लोक जास्त धाडसी होतात, जास्त सकारात्मक होतात व याचा परिणाम म्हणून post pandemic boom येते. म्हणजेच उद्योग व व्यापारमध्ये गती निर्माण होते. उद्योग व व्यापार वाढण्यास लोकांच्या बदललेल्या मानसिकतेचा फायदा होतो. 

या सर्व परिस्थितीचा अभ्यास केल्यास येणाऱ्या काही वर्षांत तंत्रशिक्षणाला पर्याय नाही हे चित्र स्पष्ट होते. आजच्या जागतिक घडामोडी पाहता भारतात येणाऱ्या वर्षांत तंत्रशिक्षणाला प्रचंड मागणी येणार हे नक्की. बरेच युरोपीय देश भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत आणि याची सुरुवातही झाली आहे, मोठे ब्रँड्स भारतात यायला सुरुवात झाली आहे, टेस्ला, APPLE या सारख्या टेक जायन्ट्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स भारतात येऊ पाहत आहेत. 

हे सर्व वातावरण भारतात रोजगार निर्मितिसाठी तर पोषक ठरणार आहेच शिवाय याचा फायदा तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासही होणार आहे. 

एस. आर. नदाफ
शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निक

Post a Comment

2 Comments