जागतिक जलदिन 2022

उद्या दि. २२.०३.२०२२ रोजी THE WORLD WATER DAY अर्थात *जागतिक जल दिन* 

हा दिन UN कडून साजरा केला जातो आणि यंदा THEME आहे - *Groundwater: making the invisible visible.* 
ही थीम निवडण्याचे कारण स्पष्ट आहे. भूजल हा एक अदृश्य खजिनाच आहे जो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. या जलसाठ्याने आपले जीवन सुकर आणि समृद्ध केले आहे. बदलते ऋतुमान आणि ग्लोबल वोर्मिंग मुळे आज या जल साठ्याचे महत्व अनन्यसाधारण वाढले आहे. या साठ्याची काळजी घेणे व भूजल पातळी टिकवणे किंबहुना ती वाढवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज उपलब्ध असलेले भूजल हे पर्यावरण समतोल राखण्यास खूप महत्वाचे आहे. पण याबद्दल म्हणावी तशी जागरूकता दिसत नाही. या पाण्याच्या साठ्यावर शेती, कारखाने तसेच पूर्ण Eco System अवलंबून आहे. म्हणून या साठ्याची आपल्याला योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरुन पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. यासाठी आपण मॅजिक पिट, वॉटर कप यासारख्या संकल्पना राबवू शकतो तसेच प्रत्येकाने भूजल पातळी वाढविण्यासाठी आपल्याला काय करता येईल का? याचा गँभीर विचार करणे गरजेचे आहे. 

श्री. एस.आर. नदाफ
शरद पॉलिटेक्निक

Post a Comment

0 Comments