अडथळा


अडथळा....

पूर्वी सर्वांकडे बजाज स्कुटर असायची म्हणजे 2 स्ट्रोक इंजिन. आणि बऱ्याच वेळेला त्याच्या कार्बोरेटर मध्ये कचरा यायचा आणि इंजिन मिसफायर व्हायचं... याचा उपाय अगदी सोपा होता उपाय कसला जुगाडच म्हणा but it was damn effective...
तो उपाय म्हणजे कार्बोरेटर मध्ये कचरा आला की accelerator वाढवायचा आणि यामुळे कचरा चट्कन बाहेर फेकला जायचा व इंजिन सुरळीत सुरू एकदम okay.... Ready to ride....

आपले जीवनही थोडेफार त्या स्कुटर सारखेच आहे....
आपल्या जीवनात सुद्धा बऱ्याच अडचणी-अडथळे  त्या कचऱ्यासारखे येत राहतात... मग आपण ही तोच जुगाड करायचा कचऱ्याकडे लक्ष न देता आपल्या कामाचा accelerator म्हणजेच कामाचा वेग वाढवायचा 

अडथळा आपोआप बाहेर फेकला जाईल....
SRN
speakingfountain.com


Post a Comment

0 Comments