यावर्षी पालक व विद्यार्थ्यांचे डिप्लोमाला प्राधान्य

यावर्षी एकूणच  विद्यार्थी व पालक डिप्लोमा इंजिनीअरिंग ला प्राधान्य देताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचा कल, तंत्र शिक्षणात संधी, पालकांची वाढलेली जागरूकता, देशभरातील घडामोडी व खासकरून Post Pandemic Boom ही याची प्रमुख कारणे सांगता येतील. 
यावर्षी विद्यार्थ्यांचा कल हा तंत्रशिक्षण घेण्याकडे दिसत आहे व याचाच परिणाम म्हणून डिप्लोमा इंजिनिअरिंग ला विद्यार्थी प्राधान्य देताना दिसत आहेत. एका सर्वेक्षणानुसार पालकवर्गाची शिक्षणा बद्दलची जागरूकता वाढलेली दिसून आली आहे. तंत्र शिक्षण मंडळाच्या विविध प्रसार कार्यक्रमांमुळे ही जागरूकता वाढलेली आहे. याचबरोबर इतिहासाचा अभ्यास केल्यास Post Pandemic Boom या concept नुसार येणाऱ्या काळांत औद्योगिक क्षेत्रांत प्रचंड संधी उपलब्ध होतील.
सध्याचे औद्योगिक चित्र व टेक्नॉलॉजीकल ग्रोथ पाहता भारतात व भारताबाहेर तंत्र शिक्षणाची पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड संधी मिळणार हे नक्की.

प्राध्यापक श्री. एस. आर. नदाफ
speakingfountain.in

Post a Comment

0 Comments