सिंहावलोकन....



सिंहावलोकन....

कधी कधी आपण आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं होऊन जातं. बऱ्याच वेळेला आपण ऑटो पायलट मोडवर जगत असतो नाही का? म्हणजेच आसपास काय सुरू आहे, आपण काय करत आहोत याचे भानदेखील आपल्याला नसते. अशावेळी आपण थांबून सिंहावलोकन (Recapitulation) केले की आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणच देऊन जातो. आपण काय चुकत आहोत काय बरोबर करत आहोत हे कळून जाते. पण सिंहावलोकन करण्यासाठी एक अट असते ती म्हणजे तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक असलं पाहिजे तरच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, बऱ्याच जणांना हे शक्य होतं नाही. इथेच आपण चुकतो आणि पुन्हा पुन्हा त्याच चुका होत राहतात. काही वेळेला आपल्यालाच चुका टाळायच्या नसतात. मग त्या होतंच राहणार....

अशावेळी तुम्हांला तुमच्या जीवनाचा आरसा दाखवणारा गरजेचा असतो आणि तिथे तुमची प्रश्न संपतात....

SRN

Post a Comment

0 Comments