मराठी भाषा दिवस

बालपण आमचं मराठी,
टपरीवरील तो चहा आमचा मराठीच

आईचं प्रेम आमचं मराठी
वडिलांचा राग आमचा मराठी
मित्रांचा स्वॅग आमचा मराठीच

बहिणीचा रुसवा आमचा मराठी
भावाचा धाक आमचा मराठी 
नात्यातील गोडवा आमचा मराठीच

पावसातील मातीचा सुगंधही मराठी
थंडितली शेकोटी आमची मराठी
रकरकतं ऊन आमचं मराठीच

भविष्याची रेषा आमची मराठी
स्वप्नांची आशा आमची मराठी 
मनाची भाषा आमची मराठीच

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
SRN

Post a Comment

0 Comments