समाज आणि जंगल....

समाज आणि जंगल....

समाज आणि जंगल यांत जास्त फरक नाही....
जंगलात जसे वेगवेगळे प्राणी असतात अगदी तसेच प्राणी समाजात सुद्धा असतात... होय समाज एक जंगलच आहे, इथे तुम्हांला सगळे प्राणी भेटणार अगदी सगळे. आणि ते त्यांच्या पद्धतीने च जगणार वाघ शिकार करणारच त्याला पर्याय नाही.
हरीण धावणारच त्याला जगण्यासाठी हे करावंच लागेल
अस्वल दुसऱ्याने तयार केलेले मध खाणारच ती त्याची सवय आहे. माकड सरळ रस्ता सोडून उड्या मारणारच. ससा घाबरतच जगणार. हत्ती कशाचीच तमा न बाळगता निवांत फिरणार. साप वेडेवाकडेच जाणार. मगर अचानक हल्ला करणार ती त्याची खासियत. लांडगा लबाडी करणारच.....
तुम्ही वाघाला शिकार करण्यापासून रोखू शकत नाही तो करणारच. अस्वल ला मध खान्यापासून रोखू शकत नाही. लांडग्याला कितीही सांभाळलं तरी तो लबाडी करणारच
मग जगायचं असेल तर एकच पर्याय....
या प्राण्यांना ओळखता आले पाहिजेत बस्स....

@Sarfaraj
speakingfountain.com


Post a Comment

0 Comments