जीवन.....

जीवन.....

जीवन नेहमीच सरळ सोपे असेल ही अपेक्षा करणे म्हणजे लाटांशिवाय समुद्राची अपेक्षा करणे होय, म्हणजे अशक्य. जीवनात चढ उतार असणारच. कधी खूप आनंद असेल तर कधी दुःख असेल. कधी सन्मान मिळेल तर कधी अपमान. कधी लोक तुमच्या बाजूने उभे राहतील तर कधी तुम्ही एकटेच असाल. कधी जिंकाल तर कधी हार पत्करावी लागेल. कधी खूप अडचणी येतील पण त्यातून मार्ग पण निघेल. प्रत्येक गोष्टीतून तुम्ही काहीतरी शिकत जाल. पण काहीही झालं तरी थांबायचं नाही, लढत रहायचं, अगदी शेवटपर्यंत... कोण सोबत असो वा नसो.... ते म्हणतात ना The best is yet to come तुमच्या आयुष्यात अजून सर्वोत्कृष्ट येणं बाकी आहे.
तुमच्या कर्माची फळे तुम्हांला नक्की मिळणार कारण निसर्गाचा तो नियमच आहे.  

- SRN
speakingfountain.com

Post a Comment

0 Comments