गिरवलेली भिंत.....

गिरवलेली भिंत.....
कितीही वह्या दिल्या तरीसुद्धा भिंती आणि फरशीवर लिहिणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. अस म्हणून भिंती रंगवणाऱ्या बालचमूना भिंतीवर लिहण्याची कला जणू वारसा हक्कात मिळते, नाही का? भिंतीवर लिहल्या शिवाय शिक्षण पूर्ण होत नाही अशी जणू त्यांची समजूत असावी आणि म्हणूनच कितीही मार बसला कितीही रागावून घेतलं तरीही ते भिंती रंगवण्यात मग्न असतात आणि त्यात पारंगत होतात. खरं सांगायचं तर त्या गिरवलेल्या, रंगवलेल्या भिंतीत एक प्रकारची ऊर्जा असते एक प्रकारचा आनंद असतो, एक प्रकारचा जिवंतपणा असतो. एक प्रकारचा innoncence असतं ते चकचकीत भिंतीला कधीच येणार नाही........
कदाचित आता मुलांनी रंगवलेल्या भिंतीकडे बघताना मनात एक वेगळा भाव असेल....
SRN
23.4.23

Post a Comment

0 Comments