लहानपणीचा प्रवास

लहानपणी ज्यावेळी मी लांबचा प्रवास करायचो त्यावेळी प्रवासात बऱ्याच अनोळखी गाड्या मागे पुढे दिसायच्या आणि काही काळानंतर त्यांची सवय व्हायची. त्या गाड्या दिसल्या नाही की चुकल्यासारखे व्हायचे, पुढे पुढे एक एक करून अचानक कोणत्यातरी वळणावर या सर्व गाड्या वेगवेगळ्या मार्गांनी निघून जायच्या. आणि एक आठवण सोडून जायच्या.

आयुष्याचं ही अगदी असच असतं नाही का? आपल्या जीवनाच्या प्रवासात बरेच अनोळखी लोक आपल्या सोबत येतात काही काळ आपल्या सोबत राहतात आपल्याला त्यांच्या सोबत रहायची सवय होते. आणि अगदी लहानपणपणी च्या प्रवासासारखंच अचानक कोणत्यातरी वळणावर आपापल्या मार्गाने निघून जातात, आणि राहतात फक्त त्यांच्या आठवणी....

म्हणूनच तर जोपर्यंत हे लोक तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत त्यांना  आनंद द्या, त्यांची मदत करा. 

S.R.N.

Post a Comment

2 Comments

Unknown said…
Right Sir.. We have to just live in moment.
खरय..लहाणपणीचा हा प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहतो..