लेखक हा वाचकाविना शून्य
लेखक हा वाचकाविना शून्य असतो वाचकांची साथ त्या शून्याला लाखात बदलतात मग लेखक शब्दांच्या कोटी करतो. 
वाचकांचा प्रतिसाद हा लेखकाला ऊर्जा प्रदान करत असतो. योग्य वाचकांमुळेच लेखकाला लिहण्याची दिशा कळते. लेखक बऱ्याच वेळेला लिहत असताना वाचकाला काय अपेक्षित आहे याचा विचार करून लिहत असतो. त्यामुळे लेखकाचे यश हे वाचकाशिवाय अशक्य आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. 
मी काही नवीन लिहण्याचा प्रयत्न करत आहे. बदलत्या काळानुसार मी लेखनाचा एक नवीन प्रकार मांडत आहे. तो म्हणजे सूक्ष्म लेख, या प्रकारचा लेख आधी कोणी लिहला आहे की नाही हे माहीत नाही पण आज कालच्या धावपळीच्या काळात लोकांना मोठे लेख वाचण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे सूक्ष्म लेख हा प्रकार त्यांना आवडेल, यात कमीत कमी शब्दांत विविध विषय हाताळण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न...
तुम्ही माझ्या प्रवासात माझ्या सोबत एक चोखंदळ वाचक म्हणून असणार ही खात्री आहे.

SRN

Post a Comment

0 Comments