सोशल मीडिया....

आज सोशल मीडिया आपल्या सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहे आणि यात जरासुद्धा अतिशयोक्ती नाही. आपण आपली प्रत्येक छोटी गोष्ट whataapp, facebook, twitter किंवा instagram सारख्या सोशल साईट्स वर पोस्ट करत असतो. बरेच जण व्यक्त होण्यासाठी या साईट्सचा वापर करतात. तर बऱ्याच जणांना याच साईट्स मूळे आधार मिळतो. काहीही असो एकमात्र नक्की या साईट्स वरून एखादी गोष्ट लगेच वनव्यासारखी पसरते. म्हणजे ती viral करण्याचे सामर्थ्य या सोशल मीडिया मध्ये आहे. मग ती गोष्ट खरी असो वा खोटी....
जसा या साईट्स चा वापर वैयक्तिक प्रसिद्धी साठी होतो तसाच एखादा व्यवसाय प्रसिद्ध करण्यासाठीही होतो. जर तुम्हांला तुमचा व्यवसाय किंवा तुमचा एखादा प्रॉडक्ट प्रसिद्ध करायचा असेल तर सोशल मीडिया सारखं दुसरं प्लॅटफॉर्म नाही. 
Community sentiments ला reality मध्ये आणण्याचे सामर्थ्य या सोशल मीडियामध्ये आहे, उदाहरण द्यायचेच झाले तर ELON MUSK च्या एका TWEET मुळे DOGECOIN सारखा एक MEME कॉईन काहीं तासांत हजारो टक्के वाढतो. तर सुचेता दलाल च्या एका ट्विट मुळे upper circuit लागलेला A..... power सारखा स्टॉक दणक्यात खाली आदळतो. व त्याला LOWER CIRCUIT लागते अशी बरीच उदाहरणे देता येतील एवढं प्रचंड POTENTIAL या सोशल मीडिया मध्ये आहे. 
या साईट्स चा आपण योग्य वापर केल्यास व्यक्त होण्यासाठी चा एक प्लॅटफॉर्म तर मिळतोच शिवाय याचा योग्य तो वापर केल्यास आपला व्यवसाय किंवा प्रॉडक्ट आपण प्रसिद्ध करू शकतो म्हणजेच MARKETING करण्याचा एक चांगला मार्ग सोशल मीडिया आपल्याला प्रदान करते. तरी त्याचा योग्य वापर करून घेणे काळाची गरज बनली आहे. 
Sarfaraj Nadaf (SRN)
Speaking fountain

Post a Comment

0 Comments